Loksabha election : शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपची भूमिका अखेर महत्त्वाची ठरणार

शिंदे गटाचे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा जोरदार रंगली आहे. आणि तो नक्कीच असेही बोलले जात आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मेळावा ही मंचर येथे होत आहे.
Loksabha election
Loksabha electionsakal

चाकण : शिंदे गटाचे शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार अशी चर्चा जोरदार रंगली आहे. आणि तो नक्कीच असेही बोलले जात आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मेळावा ही मंचर येथे होत आहे. माजी खासदार आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आणि तेथून लोकसभेची उमेदवारी मिळवणार या चर्चेला उत आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपने चाकण येथे मोठा मेळावा घेतला होता त्या मेळाव्यात शिरूर मध्ये भाजप कमळ फुलवणार अशाही चर्चा केल्या होत्या.त्यामुळे नक्की शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपची भूमिका काय आहे.याबाबत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो त्या अगोदर तो काँग्रेस,राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. जुन्या खेड व आताच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार आढळराव पाटील हे सलग तीन वेळा निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले सध्याचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. माजी खासदार आढळराव पाटील हे उद्धव ठाकरे शिवसेनेतून शिंदे गट शिवसेनेत आले आहेत. माजी खासदार आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले असले तरी त्यांनी गेली पाच वर्षे सातत्याने मतदारसंघात फिरून विकासाची कामे करून जनतेशी संपर्क ठेवला.

कोरोना काळातही ते जनतेबरोबर राहिले असे चित्र होते. पुढे पुन्हा ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अगदी आग्रही आहेत. ही जागा नेमकी कोणाकडे जाते यावर सगळ्यांचे भवितव्य अवलंबून आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी लोकसभेची उमेदवारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी ही काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जोरदार चर्चा आहे. आमदार महेश लांडगे यांचा बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून तरुण वर्गाशी, बैलगाडा मालक, शौकीन यांच्याशी मोठा संपर्क आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांना त्याचा फायदा निवडणुकीत होऊ शकतो असेही अंदाज वर्तविले जातात.

Loksabha election
Raj Thackeray ; ‘मनसे’ तयारीअभावी ‘राज’संताप ; अनेक पदाधिकारीच न आल्याने बैठकीवर पाणी

महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी त्या पक्षाने निश्चित केलेली आहे. फक्त उमेदवारी देण्याबाबत जाहीर करण्याबाबत महायुतीतच अजून संभ्रम निर्माण होत आहे. शिंदे गटाचे शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि तेथून ते लोकसभेची उमेदवारी घेतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे. मंचर येथील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मेळाव्याला ही त्यादृष्टीने विशेष महत्त्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खेड, आंबेगाव, जुन्नर या तीनही तालुक्यात आमदार आहेत.त्यामुळे त्यांनी लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे अशी चर्चा आहे.

आमदार दिलीप मोहिते यांनी आढळरावपाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध केलेला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार जो निर्णय देतील तो सर्वांना मान्य करावा लागेल.त्यामुळे आमदार मोहिते यांची भूमिका ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे असेही मानले जाते. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनीही आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. महायुती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य करावा लागेल असे वास्तव आहे.

राज्याचे सहकार मंत्री आणि आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ नेतृत्व दिलीप वळसे पाटील यांची भूमिका ही महत्त्वाची आहे. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागील लोकसभेच्या निवडणुकीत डॉ.अमोल कोल्हे यांना मोठे मताधिक्य दिले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा आंबेगाव तालुक्यातील उमेदवार असला तर नामदार वळसे पाटील मोठे मताधिक्य देतील आणि उमेदवार सहज निवडून येईल. त्यामुळे आढळरावपाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेण्याचे निश्चित केलेले आहे असेही वर्तविले जात आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी याबाबत सांगितले की, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल " भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे लोकसभेबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

खेड तालुक्यातील भाजपचे नेते जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, राम गावडे काय भूमिका घेतात महायुतीत कोणता उमेदवार ठरवायचा याबाबत त्यांची भूमिका ही महत्त्वाची आहे.परंतु पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे तो त्यांनाही मान्य करावा लागेल. खेड तालुक्यातील आमदार दिलीप मोहिते यांचे विरोधक शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, तसेच जिल्हा संघटक अशोक भुजबळ,नितीन गोरे, राजुशेठ जवळेकर माजी खासदार आढळराव पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात की शिवसेनेतच राहतात हे बरेच काही सांगून जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com