
पुणे, ता. १९ : ‘घरगुती ग्राहकांचे वीज देयक शून्यवत करणाऱ्या पीएम सूर्यघर योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी केले.
या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण आणि ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (मास्मा) यांच्या वतीने बनविण्यात आलेल्या सौररथाचे उद््घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोहोळ यांनी हे आवाहन केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, ‘मास्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, खजिनदार समीर गांधी उपस्थित होते.