पुणे : अंधारात जाळलेल्या गुटख्याचे गौडबंगाल काय?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

दोन दिवसांपूर्वी सोलापूर पुणे सोलापूर महामार्ग येथील थेऊर जवळील गायरान जमिनीवर रात्रीच्या सुमारास गुटका जाळल्याचा प्राथमिक माहिती येते.  प्रत्यक्षात एवढे मोठया प्रमाणावर गुटखा जप्त केलेला असताना अंधारात जाळलेल्या गुटख्याचे गौडबंगाल काय अशा प्रश्न पडत आहे

पुणे : जिल्ह्यातील लोणी काळभोर आणि वाघोली येथे गेल्या काही दिवसापूर्वी एफडीआय आणि स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या साठवून ठेवलेल्या गुटखाविरोधात कारवाई केली होती. जप्त केलेला गुटखा एफडीआयच्या ताब्यात दिला होता. या सर्व कारवाईत साधारणपणे एक कोटीच्या आसपास गुटखा असल्याचे सांगितले होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी सोलापूर पुणे सोलापूर महामार्ग येथील थेऊर जवळील गायरान जमिनीवर रात्रीच्या सुमारास गुटका जाळल्याचा प्राथमिक माहिती येते.  प्रत्यक्षात एवढे मोठया प्रमाणावर गुटखा जप्त केलेला असताना अंधारात जाळलेल्या गुटख्याचे गौडबंगाल काय अशा प्रश्न पडत आहे

घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जाळलेला गुटका हा खूपच थोड्या स्वरुपात असल्याचे दिसून येत आहे. या कारवाईत काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगू लागली आहे. अशी कारवाई करून पुन्हा बाकीचा गुटका मार्केटमध्ये विकली जात असल्यास देखील चर्चा आहे. एकूणच काय तर या कारवाई मागे मोठे अधिकारी असल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळेो सध्या पुणे ग्रामीण भागामध्ये या गुटखा कारवाई बाबतीत  मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is reason gutkha burnt in the dark in Pune