एमपीएससी परीक्षांचे काय होणार ?

MPSC
MPSC

पुणे ः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या 2020 मधील तीन परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या, त्यानंतर आता आरक्षण प्रश्‍नामुळे त्यावर स्थगिती आली. आम्ही एप्रिल महिन्यापासून परीक्षेची तयारी करत आहोत. आरक्षणावर न्यायालयात तारीख पे तारीख अशीच स्थिती आहे. त्यावर कधी मार्ग निघेल? परीक्षा कधी होणार? यावर राज्य सरकारने स्पष्टता दिली पाहिजे असे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा गणेश फुटाणे सांगत होता.

"एमपीएससी'तर्फे 2020 मध्ये राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. या परीक्षा एप्रिल व मे महिन्यात होणार होत्या. पण मार्च मध्ये कोरोना झपाट्याने वाढण्यास सुरवात झाल्याने या परीक्षा पुढे ढकलल्या. लॉकडाऊन काळात तीन वेळा या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. अखेर 11 ऑक्‍टोबर रोजी राज्य सेवा पूर्व परीक्षा, 1 नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी सेवा आणि 22 नोव्हेंबर रोजी अराजपत्रित गट "ब'ची परीक्षा होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने "एसइबीसी' आरक्षणावर स्थगिती आणल्याने राज्य सरकारने या तिन्ही परीक्षांवर स्थगिती आणलेली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 

आरक्षणाच्या प्रश्‍नामुळे 2020-21 ची प्रवेश प्रक्रिया स्थगित झाली होती, त्याबाबत राज्य सरकारने 25 नोव्हेंबर रोजी आदेश काढून "एसईबीसी'च्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश द्यावा असे सांगितले. तसेच कोरोना काळात सरकारने शिक्षक भरतीवर स्थगिती आणली होती, त्यावरील स्थगिती उठल्याने आता 6 हजार शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, सरकारने अजून पर्यंत एमपीएससी परीक्षेवर स्पष्टता आणलेली नाही.

महेश घारबुडे म्हणाला, "कोरोनानंतर आता परिस्थिती सुधारलेली आहे, गावाकडे गेलेली मुले पुण्यात आले आहेत. समाजातील सर्व घटकांचा विचार सरकारने करून "एमपीएससी'च्या परीक्षा लवकर घेतल्या पाहिजेत. परीक्षांच्या तारखा स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक तणावात आहेत, शिवाय पैसेही खर्च होत आहे. आरक्षणावर पुढची सुनावणी 25 जानेवारी रोजी होणार आहे. पण त्यातही तोडगा निघेल का माहिती नाही. त्यामुळे सर्वांचा विचार करून सरकारने यातून सुवर्णमध्य काढावा.

वाघोली : आमचा गाव आणि आमची ग्रामपंचयातच बरी

याबाबत "एमपीएससी'तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "2020 मधील परीक्षा घेण्याची आमची तयारी पूर्ण आहे. सरकारने जशी शैक्षणिक प्रवेशावरील स्थगिती उठवली. तशी परीक्षांवरील स्थगिती उठवली तर आम्ही पुढील वेळापत्रक जाहीर करू शकतो. पण यासाठी शासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे.


2021 च्या भरतीचे काय ?
2020 हे वर्ष संपत आले पण या वर्षातील परीक्षा झालेल्या नाहीत. आता 2021 मधील पदभरतीसाठी जाहिरात निघणार का नाही याबाबत स्पष्टता नाही. याबाबत राज्य सरकारने धोरण जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी अभ्यास करणे सोईचे जाईल, असे फुटाणे याने सांगितले.

संतांनी जोडलेल्या भारताला राजकारण्यांनी तोडले : राज्यपाल कोश्यारी

परीक्षेचे नाव आणि पदभरती
राज्य सेवा पूर्व परीक्षा - 200
अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा - 806
अभियांत्रिकी संयुक्त परीक्षा - 217
दाखल अर्ज सुमारे - 4.5 लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com