
पुणे - शहरात सराईत गुंडांकडून व्यावसायिक, उद्योजकांकडून खंडणी आणि दरमहा हप्त्याची मागणी केल्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सिंहगड रस्ता, स्वारगेट, लष्कर आणि वाघोली परिसरात अशा घटना नुकत्याच घडल्या. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा हप्ता वसूल करणाऱ्या गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.