तलवारीने केक कापतानाचा व्हॉटस्‌अप स्टेटस ठेवणाऱ्यांना पोलिसांकडून बेड्या

तलवारी व कोयते बनवून गुन्हेगारांना विक्री करणाऱ्यालाही पोलिसांकडून अटक
pune
punesakal
Updated on

पुणे : सार्वजनिक ठिकाणी थांबून वाढदिवसाचा केक तलवारीने कापून ते छायाचित्र व्हाटस्‌अप स्टेटसला ठेवणाऱ्या तिघांना दत्तवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याचबरोबर तलवारी व कोयते बनवून गुन्हेगारांना त्याचा पुरवठा करणाऱ्यालाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हत्यारांचा वापर करणाऱ्या व त्यांची विक्री करणाऱ्यांना चांगलीच जरब बसण्याची शक्‍यता आहे. (PUNE News)

रितेश बाळु पायके (वय 19), आदित्य संजय नलावडे (वय 19, दोघेही रा. जनता वसाहत ) असे तलवारीने केक कापतानाचे व्हॉटस्‌अप स्टेटस ठेवणाऱ्या आणि धारदार शस्त्र बाळगणाऱ्यांची नावे आहेत, तर प्रेम योगेश पवार (वय 24, रा. नवीआळी झोपडपट्टी , भोर ) असे हत्यारे विक्री करणाऱ्याचे नाव आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

शहरात काही वर्षांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून सार्वजनिक ठिकाणी तलवार, कोयत्याने केक कापून सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्‍वभुमीवर अशा तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

pune
खडकवासला धरणातील पाणी होतंय नितळ

दत्तवाडी पोलिसांचे तपास पथक झोपडपट्ट्यांसह इतर वसाहतीमधील उपद्रवी तरुण व गुन्हेगार यांच्या व्हॉट्‌सअपसह अन्य समाजमाध्यमांच्या ग्रुपवर येणारे गुन्हेगारी कृत्यांवर लक्ष ठेवत होते. काही दिवसापूर्वी तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याची छायाचित्रे व्हॉटसअप स्टेटसला ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जनता वसाहतीमधील काही तरुणांकडून केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबधीत तरुण हे जनता वसाहतीतील राम मंदिराजवळ हातामध्ये शस्त्र घेऊन थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी रितेश पायके व आदित्य नलावडे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तलवारी जप्त केल्या.

pune
शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयावर तुरुंगात असलेल्या प्रदीप शर्मांचा फोटो

त्यांच्याकडे येणाऱ्या तलवारी व कोयत्यांसारखी धारदार शस्त्रे कोठून येतात, याबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली. दरम्यान, शस्त्र तयार करून तो पुरवठा करणारा व्यक्ती जनता वसाहतीमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून योगेश पवार यास अटक केली. त्याच्याकडून सात प्राणघातक शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. आरोपींनी चोरलेल्या गाडीच्या पाट्यापासून पवारने त्यांना हत्यारे बनवून दिले होते. वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर व पोलिस निरिक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, शिवाजी क्षीरसागर, नवनाथ भोसले, अमित सुर्वे, विष्णु सुतार, यांच्या पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com