गरजू वृद्धांना व्हीलचेअर्सचे वाटप
बालेवाडी, ता. ४ : सारथी सोशल फाउंडेशनतर्फे बालेवाडी येथील स्वर्णनगरी वृद्धाश्रमात गरजू वृद्धांना व्हीलचेअर्सचे वाटप करण्यात आले. फ्रान्समधील पॅरिस येथून आलेल्या कॅमी डेलफी यांच्या हस्ते हा उपक्रम पार पडला.
आधाराविना चालू-फिरू न शकणारे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे व्हीलचेअर खरेदी करणे शक्य नसलेल्या वृद्धांना या उपक्रमातून मदत करण्यात आली. व्हीलचेअर्स मिळाल्यानंतर वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. ‘‘आम्हाला पुन्हा स्वतंत्रपणे फिरता येणार आहे. संस्थेने दिलेल्या या मदतीबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत,’’ अशा भावना लाभार्थींनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला सारथी संस्थेच्या वतीने आनंद पाटील व ऋषिकेश भोसले उपस्थित होते. स्वर्णनगरी वृद्धाश्रमाच्या कार्यवाहक रश्मी देडे यांनी संस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

