जेव्हा जवान त्यांना भेटायला येतात... 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

जुन्नर (पुणे) : राखीपौर्णिमेनिमित्त देशभरातील अनेक विद्यार्थिनी सीमेवरील जवानांना राख्या आणि भेटकार्ड पाठवितात. त्यामुळे खरोखरच जवानांना प्रेरणा मिळते. त्याचा प्रत्यय आज जुन्नरमधील विद्यार्थिनींना आला. येथील शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थिनींनी ज्या जवानांना राख्या पाठविल्या होत्या, ते जवानच आज शाळेमध्ये अनपेक्षितपणे भेट देण्यासाठी आले आणि या भेटीने विद्यार्थिनी अक्षरश: भारावून गेल्या. 

एकीकडे सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असताना, या शाळेत बुधवारी (ता.11) बहिण-भावांच्या नात्यांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. त्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री काजळे यांनी सांगितले. गडचिरोली येथील बटालियनमधील जवानांना पाठविलेल्या राख्या व शुभेच्छापत्र मिळाल्यानंतर तेथील रोहित वर्मा, प्रदीप सपकाळ, व्ही. सी. आंबूलगेकर, एल. पी. वासेकर, के. व्ही. भास्करन या जवानांनी या विद्यार्थिनींचे स्वतः पत्र लिहून कौतुक केले. तसेच त्यांच्यासाठी मिठाई पाठवून दिली. या उपक्रमाच्या यशाने या विभागाचे काम पाहणाऱ्या सविता कुलवडे व इतर शिक्षकदेखील भारावून गेले होते. 

रोहित वर्मा म्हणाले, ""आम्हाला इतक्‍या प्रेमाने विद्यार्थिनींनी राख्या पाठविल्या. त्यामुळे आम्हाला देशसेवा करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. या सर्वांच्या प्रेमापोटी आम्ही त्यांना भेटायला आलो. त्यांना जितका आनंद झाला आहे, तितकाच आनंद आम्हाला आज वाटतो आहे.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When Army Jawans come to meet them...