RTO : आरटीओच जेव्हा बेशिस्त होते

आरटीओ वतीने बेशिस्त वाहनचालकांना दंड केला जातो
RTO
RTOesakal

धायरी : प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओतर्फे वाहन चालकांना नियम शिकवले जातात. मात्र या आरटीओचेच एक वाहन आज बंगळुरू महामार्गावर नवले पुलाच्या दिशेने, विरुद्ध बाजूने सेवा रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाताना दिसली.

RTO
Jalgaon News : सीमावर्ती भागातील चेक पोस्टवर लक्ष द्या! चोपडा येथील बैठकीत सूचना

आरटीओ वतीने बेशिस्त वाहनचालकांना दंड केला जातो तसेच विविध नियम व शिस्त पाळण्यासाठी आवाहन केले जाते. मात्र बंगळुरू महामार्गावर आज आरटीओच्या अधिकृत वाहनानेच नियमभंग केल्याचे नागरिकांना दिसून आले आहे. नवले पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रचंड वेगाने चारचाकी वाहने  जातात. अशा स्थितीत आरटीओचे वाहन राॅंग साईडने पुलाच्या दिशेने चालले होते. काही जागरूक नागरिकांनी यांचे व्हिडिओ  चित्रीकरण केले.   

RTO
Latur News : लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैशाचा तुटवडा

"सर्वसामान्य वाहन चालकांना अनेक नियम आरटीओ लावत असते. परंतु आज दुपारच्या वेळी नवले पुला जवळील सेवा रस्त्यालगत नवले पुल ते वडगाव पुला दरम्यान विरुद्ध दिशेने आरटीओचे वाहन भरधाव वेगाने गेले. वाहनामध्ये एक महिला अधिकारी सह एक चालक विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने गेले .संबंधित वाहनावर व अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार."

-राजेश वैद्य, वाहनचालक..

अशा चुकीच्या पध्दतीने वाहन चालविण्याने अपघाताला निमंत्रण मिळाले असते असे काही वाहनचालकांनी 'सकाळ 'ला बोलून दाखवले. दरम्यान आरटीओचे संबंधित वाहन कोठे चालले होते याची माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला असता ती मिळू शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com