Pune News : शिक्षकाला आली चक्कर सिंहगडचे स्थानिक धावले मदतीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

Pune News : शिक्षकाला आली चक्कर सिंहगडचे स्थानिक धावले मदतीला

खडकवासला : सिंहगडावर सहल घेऊन आलेल्या शिक्षकाला अचानक चक्कर आली. त्याला कामगार व स्थानिकांनी मदत केली. त्याला गडावरील खासगी जीप मधून खासगी रुग्णालयात आणल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना आज शुक्रवारी दुपारी घडली आहे.

दिनकर शिवाजी सातपुते (गाव मांडूकली, श्रीगोंदा जि.अहमदनगर) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. सातपुते यांच्या शाळेची सहल सिंहगडावर आली होती. गडाच्या पश्चिमेला असलेल्या तानाजी कड्याच्या परिसरात एका शिक्षकाला चक्कर आली होती. वेळ दुपारची होती. पुरातत्व विभागाच्या सामाजिक दायित्व उपक्रमातील कामगार तानाजी मालुसरे स्मारकस्थळी स्वच्छता करीत होते.

त्या कामगारांनाला फोन आला कोणाला तरी चक्कर आली आहे. स्वप्निल सांबरे, दता जोरकर, राहुल जोरकर हे कामगार घटनास्थळी पोचले. त्यांनी सातपुते यांना उचलुन सुमारे एक दीड किलोमीटर चालत गडाच्या वाहन तळावर आणले. वाहन तळावरील एका खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपमध्ये बसविले. ते रूग्णालयात घेऊन गेले.

मदत करणारे कामगार हे पिंपळे गुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे मालुसरे स्मारकस्थळ येथील कर्मचारी राहुल जोरकर, दत्ता जोरकर व छत्रपती राजाराम महाराज समाधीस्थळी शिवणे येथील साईराज डेव्हलपर्सचे कार्यरत असलेले कर्मचारी स्वप्निल सांबरे स्थानिक कार्यकर्ते ओंकार पढेर, घेरा सिंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक नंदू जोरकर यांनी त्याला वाहन तळापर्यंत आणण्यास मदत केली.