
ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
जसा चालण्याच्या वाटेवर प्रकाश लागतो, तसाच जगण्याच्या वाटेवरही तो आवश्यक असतो आणि हा प्रकाश अर्थात ज्ञानाचा असतो. म्हणूनच नामदेव महाराज ‘ज्ञानदीप लावू जगी’ असं म्हणतात. हीच प्रतीकात्मकता लक्षात घेऊन कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून होते. समईच्या ज्योती उजळल्या की सगळंच तेजाळून निघतं.
पुण्याबाहेर भटकंतीला गेलो होतो, तेव्हा रात्री जेवत असताना आमच्या हाॅटेलच्या डायनिंग हाॅलचे लाइट काही क्षणांसाठी गेले. अगदी साधीच गोष्ट होती; पण स्वाभाविकपणे लहान मुलांच्या रिॲक्शन्स ‘ओह नो’ वगैरे अशा... कारण लाइट जाण्याची सवयच नाही; पण यानिमित्ताने मी माझ्या लाइट गेल्यावरच्या आठवणी, गमती-जमती आर्यला सांगितल्या.