esakal | सिंहगड, खडकवासला चौपाटी कधी सुरू होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

When will Chowpatty start on Sinhagad, Khadakwasla

सिंहगडावरील चवदार पिठलं भाकरी, कांदाभजी दही- ताक तसेच धरण चौपाटीवरील ओली- भेळ, पाणी- पुरीसह मक्याची कणसे विविध खाद्यपदार्थ येथे विक्रेते आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे हजार विक्रेते आहेत. परंतु मागील सात-आठ महिन्यांपासून येथील सगळे विक्रेत्यांची व्यवसाय बंद आहेत यातील सर्वांचे खाद्य पदार्थ विकून पोट भरतात.

सिंहगड, खडकवासला चौपाटी कधी सुरू होणार?

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्ह्यातील पर्यटन स्थळ, सार्वजनिक व गर्दीची ठिकाणं जिल्हाधिकाऱ्यांच्या एका आदेशांनी बंद झाली. जिल्ह्यातील लोणावळा, भुशी डॅम यांसारखे अनेक पर्यटन स्थळ सुरू झाली. त्यानंतर गड- किल्ले ट्रेकर्ससाठी सुरू झाले. परंतु शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ला व खडकवासला चौपाटी अद्याप सुरू झालेली नाहीत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सिंहगडावरील चवदार पिठलं भाकरी, कांदाभजी दही- ताक तसेच धरण चौपाटीवरील ओली- भेळ, पाणी- पुरीसह मक्याची कणसे विविध खाद्यपदार्थ येथे विक्रेते आहेत. दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे हजार विक्रेते आहेत. परंतु मागील सात-आठ महिन्यांपासून येथील सगळे विक्रेत्यांची व्यवसाय बंद आहेत यातील सर्वांचे खाद्य पदार्थ विकून पोट भरतात. त्यामुळे मागील सात- आठ महिन्यांपासून त्यांच्याकडे कोणत्या पद्धतीचे उत्पन्न झालेले नाही. लोणावळा भुशी डॅम यासह जिल्हातील पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. परंतू शहरालगत असलेल्या सिंहगड किल्ला मात्र पर्यटनासाठी अद्याप खुला झालेला नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गड सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

मागील कित्येक वर्षांपासुन येथील स्थानिक लोकांचा सिंहगडाचे पर्यटनावरच उदरनिर्वाह चालतो. आता तरी सिंहगड पर्यटकांसाठी खुला करा. अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. घाट रस्त्यालगत संरक्षक जाळी बसविण्याचे कामही सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील आठवड्यात सुरु केले आहे. यासाठी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने परस्पर पुढील तीन आठवडे घाट रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षापासून ठेकेदारांकडून देखील जाणीवपूर्वक नोव्हेंबर,  डिसेंबर महिन्यातच काम सुरू करत असल्याचा अनुभव आहे. यामुळे पर्यटकांसह स्थानिक लोकांची गैरसोय होते. असा ही आरोप कोंडे यांनी केला आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक सई भोरे पाटील म्हणाले की, "सिंहगड किल्ला आणि चौपाटी परिसरात सुरू करण्यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"शासनाचा धोरणात्मक निर्णय झाल्यावर आम्ही ही सुरू करू. वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील पर्यटन स्थळे अद्याप आम्ही सुरू झालेली नाहीत. आमच्या हद्दीतील लोणावळा येथील लायन पॉईंट अद्याप सुरू केलेला नाही."
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे

loading image