प्रादेशिक वाहन कार्यालय कधी सुरू होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

When will Regional Vehicle Office at Handewadi Road Udyognagar start

प्रादेशिक वाहन कार्यालय कधी सुरू होणार

उंड्री - हांडेवाडी रस्ता उद्योगनगर येथील आरक्षित जागेवरील प्रादेशिक वाहन कार्यालय कधी सुरू होणार, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. मागिल सात वर्षांपूर्वी या ठिकाणी जागा आरक्षित केली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे प्रादेशिक वाहन कार्यालयाची जागा धूळखात पडले आहे. प्रशासनाने तातडीने या ठिकाणी वाहन चालविण्याचा परवाना देण्याचे काम सुरू करून हडपसर आणि परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, असा सबुरीचा सल्ला सूज्ञांनी दिला आहे.

पुणे शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहन चालविण्याचा परवना काढण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने अर्ज येतात. त्यांना वाहन चाचणी देण्यासाठी आळंदी रोड येथे जावे लागते. तेथे जागा कमी असल्याने नागरिकांची गैरसोय होते. प्रादेशिक परिवहनचे हडपसर येथे चाचणी केंद्र सुरू करून शहराच्या पूर्व भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

हडपसर येथील आरक्षित जागेवर वाहन चालविण्याचा परवाना देण्याचे कार्यालय सुरू झाल्यानंतर मुंढवा, खराडी, उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, वडकी, मांजरी बु।।, खुर्द, कोंढवा, कात्रज या परिसरातील विद्यार्थी, महिला, कामगार यांना वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी सोयीचे होईल.

- वैष्णवी सातव. सातवनगर

हांडेवाडी रस्ता उद्योगनगरीमध्ये सध्या महिन्यातून एक वेळ मोटारसायकलचे लायसन्स देण्याचे काम सुरू आहे. मनुष्यबळ उपलब्धतेनुसार इतर उर्वरित सुविधा सुरू करण्यात येणार आहेत.

- अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Web Title: When Will Regional Vehicle Office At Handewadi Road Udyognagar Start

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..