Coronavirus : लग्न होणार की नाही?

Marriage
Marriage
Updated on

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या आदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्कळितपणा असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. एकीकडे मंगल कार्यालयांना नोटिसा बजावून ‘बंद ठेवा, अन्यथा कारवाई’ असा इशारा प्रशासनाने दिला आहे; तर दुसरीकडे मात्र ‘लग्नसमारंभांवर कोणतीही बंदी घातलेली नाही,’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे नेमक्‍या कोणते आदेश खरे मानायचे, असा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील मंगल कार्यालयांना तलाठ्यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या. कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवावीत; तसेच या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा या नोटिशीच्या माध्यमातून कार्यालय चालकांना देण्यात आला. अनेक कार्यालये चालकांनी लग्नाचे घेतलेले बुकिंग अचानक रद्द केले. परिणामी, अनेक जण अडचणीत आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com