हृदयविकाराची लक्षणे जाणवताच 'या' टेस्ट करा तातडीने

डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ 
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

हृदयविकार म्हणजे ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चे निदान करण्यासाठी काही सुलभ आणि साध्या तपासण्या करता येतात. आपण हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो, तेव्हा ते रुग्णाची रक्त आणि इतर शारीरिक तपासण्या करतात. त्याचप्रमाणे, गरजेनुसार इतर काही तपासण्या करायला सांगतात.

हृदयविकार म्हणजे ‘कोरोनरी आर्टरी डिसीज’चे निदान करण्यासाठी काही सुलभ आणि साध्या तपासण्या करता येतात. आपण हृदयविकार तज्ज्ञाकडे जातो, तेव्हा ते रुग्णाची रक्त आणि इतर शारीरिक तपासण्या करतात. त्याचप्रमाणे, गरजेनुसार इतर काही तपासण्या करायला सांगतात.

आपण काही महत्त्वाच्या तपासण्या पाहू. 

१) इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम (ईसीजी) : ही अत्यंत साधी आणि सगळीकडे उपलब्ध असलेली तपासणी आहे. या तपासणीमध्ये हृदयाच्या इलेक्ट्रिकल जाळ्याविषयी माहिती मिळते. छातीत दुखत असेल अथवा छातीमध्ये जळजळ होत असेल, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरेने जवळील डॉक्टरांकडे जाऊन ही तपासणी करून घ्यावी. या तपासणीमध्ये आपल्याला हृदयविकाराचा झटका आला आहे की नाही आणि हृदयाला रक्तपुरवठा होत आहे का, हे कळते. पहिला ईसीजी नॉर्मल आला असल्यास १५ मिनिटांनंतर दुसरा ईसीजी काढून घ्यावा. या व्यतिरिक्त डॉक्टर आपल्याला ‘कार्डियाक एन्झाइम्स’ ही रक्ततपासणी करायलाही सांगू शकतात. 

२) कार्डियाक एन्झाइम्स : CPK MB ही तपासणी करून त्याची रक्तातील पातळी तपासतात. हृदयविकाराच्या झटक्याच्या पाच तासांच्या आत ही तपासणी केल्यास पातळी वाढलेली आढळते. ईसीजी नॉर्मल असल्यावरही ही तपासणी निदान करू शकते. याशिवाय ‘ट्रोपोनिन आय’ ही तपासणीदेखील हृदयविकाराचे निदान करू शकते. त्रास झाल्यानंतर अडीच आठवड्यांपर्यंत या चाचणीतून हृदयविकाराचे निदान होऊ शकते. 
हृदयविकाराच्या इतर काही महत्त्वाच्या चाचण्यांची माहिती आपण पुढील भागात घेऊ. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Which test need to do to diagnose heart attack