

नीरा नरसिंहपूर, ता. ४ : सोलापूर व हैदराबाद बाजारपेठेत पांढऱ्या कांद्याला ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची काढणी व कापणी सुरू केली आहे. तयार झालेला कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याची लगबग सध्या शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
नरसिंहपूर परिसरातील शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. कांद्याचे पीक काढणीयोग्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने कांदा जमिनीतून काढण्यास सुरुवात केली आहे. मजुरांच्या सहाय्याने काढलेला कांदा शेतातच स्वच्छ करून त्याची कापणी व प्रतवारी केली जात असून, त्यानंतर पोत्यात भरून वाहनांमधून सोलापूर तसेच हैदराबाद बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जात आहे, असे मच्छिंद्र शिंदे यांनी सांगितले.
चांगला भाव मिळाल्याने लागवड, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पाणी यासाठी झालेला खर्च काही प्रमाणात भरून निघण्याची अपेक्षा मच्छिंद्र शिंदे, प्रभाकर घोगरे, आण्णा शिंदे, सिद्धेश्वर तावरे आदि शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांद्याच्या काढणीसाठी मजुरांची आवश्यकता असल्याने परिसरात सकाळपासूनच शेतांमध्ये लगबग दिसून येत आहे. काढलेला कांदा खराब होऊ नये यासाठी शेतकरी त्याची योग्य पद्धतीने कापणी, स्वच्छता व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवत आहेत. बाजारभाव टिकून राहिल्यास पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला परिसरात आणखी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता केशव बोडके, प्रताप जाधव, विक्रम मोहिते, रणधीर मोहिते शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.
भाव कायम राहण्याची अपेक्षा
पांढऱ्या कांद्याला सोलापूर व हैदराबाद बाजारपेठेत मिळत असलेला चांगला भाव पुढील काळातही कायम राहावा, अशी अपेक्षा राहुल बागल, अशोक बोडके, संतोष सुतार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
05719
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.