

PNE26W64056 -
परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज
३ हजार तरुण-तरुणी शोधणार सेल्फीपलीकडची स्वतःची ओळख
‘हू एम आय? – बियाँड द सेल्फी’ कार्यक्रमात लोकनाथ स्वामी महाराज यांचे मार्गदर्शन; २४ नोव्हेंबरला आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ४ : सोशल मीडियावरील सेल्फी, फॉलोअर्स आणि आभासी प्रतिमेच्या पलीकडे जाऊन स्वतःचे खरे स्वरूप काय, जीवनाचा उद्देश काय, याचा शोध घेण्याची संधी सोलापुरातील तरुणाईला मिळणार आहे. इस्कॉन सोलापूरच्या वतीने २४ नोव्हेंबरला ‘हू एम आय? – बियाँड द सेल्फी’ या युवा प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज युवकांशी संवाद साधून आत्मज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनाच्या उद्देशाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
१८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींसाठी आयोजित या कार्यक्रमात सोलापूर शहर आणि परिसरातील सुमारे तीन हजार तरुणांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात बाह्य व्यक्तिमत्त्वाला महत्त्व दिले जात असताना स्वतःची खरी ओळख आणि जीवनाचे ध्येय समजून घेण्याचा विचार या कार्यक्रमातून मांडला जाणार आहे. आत्मज्ञानासोबतच आध्यात्मिक मूल्ये आणि सकारात्मक विचारांचे महत्त्वही अधोरेखित केले जाणार आहे. संपर्क : ७६७८२ १६५४७, ९६९९५ ४२०१२
--------------------------
नाटिका, व्याख्यान अन्् कीर्तनाची मेजवानी
मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत इस्कॉन सोलापूर येथील श्री श्री राधा दामोदर मंदिरात कार्यक्रम होईल. विशेष नाटिका, लोकनाथ स्वामी महाराज यांचे प्रेरणादायी व्याख्यान आणि डान्सिंग कीर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. शेवटी उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
--------------------------
युवकांमध्ये आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक मूल्यांची रुजवण व्हावी, तसेच त्यांना जीवनाचा उद्देश समजावा, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवक-युवतींनी मित्र-मैत्रिणींसह सहभागी व्हावे.
- पावन हरीनाम दास, इस्कॉन मंदिर सचिव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.