esakal | पुण्यात कोण पॉवरफुल्ल? राष्ट्रवादी-भाजपची पोस्टरबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात कोण पॉवरफुल्ल? राष्ट्रवादी-भाजपची पोस्टरबाजी

पुण्यात कोण पॉवरफुल्ल? राष्ट्रवादी-भाजपची पोस्टरबाजी

sakal_logo
By
सागर आव्हाड, शरयू काकडे

पुणे : बॅनरबाजी करणे हे आता पुण्यात काही नवीन नाही. या पुर्वीही पुण्यात काही बॅनर लागले आहे आणि त्याची चर्चाही रंगली आहेत. पुण्यात सध्या भाजप-राष्ट्रवादी यांची पोस्टरबाजी पाहायला मिळत आहे. येत्या 22 जुलैला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीने शहरात जोरदार बॅनरबाजी  केली आहे. येत्या सहा महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने आपला नेता किती पावरफूल आहे हे दाखवण्यासाठी जणू स्पर्धा लागली आहे.

पुण्यात एखादं होर्डिंग लागते आणि शहरभर त्याची चर्चा सुरू होणे हे तर आता नेहमीचच झालं आहे. सध्या पुण्यात अशाच एका पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे.शहरातल्या सगळ्या प्रमुख चौकांमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे भलेमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या वाढदिवसाचे कॅम्पेन केले आहे. त्याची टॅगलाईन आहे ''कारभारी लय भारी'' अशी आहे. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं होर्डिंग कॅम्पेन केले त्याची टॅगलाईन आहे ''नव्या पुण्याच्या विकासाचे शिल्पकार.

loading image