
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणातील हगवणे कुटुंबाच्या वकिल अॅड. विपुल दुशिंग यांच्या कोर्टातील युक्तिवादाने संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दुशिंग यांची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी पुणे बार कौन्सिलकडे करणार असल्याचे म्हटले आहे.