कोण आहे टिक-टॉक स्टार पुजा चव्हाण?

   Who is Pooja Chavan Suicide Pune Parli Bid Maharashtra minister
  Who is Pooja Chavan Suicide Pune Parli Bid Maharashtra minister
Updated on

पुणे : पुण्यात 22 वर्षीय पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. पुजाने रविवारी(ता.7) मध्यरात्री उडी मारुन तिचे जीवन संपविले. पुजाने आत्महत्या का केली? असे काय घडले होते ज्यामुळे तिने आत्महत्या केली? ही हत्या आहे ती आत्महत्या असे अनेक प्रश्न समोर उभे राहिले आहे. 



कोण होती ही पुजा?
पुजा ही मुळची बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासीची पुजा. पुजा सोशल मिडियावर अॅक्टिव्ह होती. टिकटॉक स्टार असलेली पुजा ही बंजारा समाजाची होती आणि ती समाजाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असे. पुजा ही सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात नेहमीच सक्रिय होती. माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत काही कार्यक्रमांमध्ये आणि प्रचारातील फोटो व्हायरल झाले आहेत. शिवसेनेचे यवतमाळमधील मंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे तिचे काही फोटोसुद्धा सोशल मिडीयावर पोस्ट केलेले आहेत. तसेच त्यांच्या समर्थनार्थ तिने काही फेसबुक पोस्टसुद्धा केलेल्या आहेत.

काही दिवसापुर्वीच ती बीडवरुन पुण्यात आली होती. इंग्लिश स्पिकिंगचे क्लासेस करण्यासाठी ती पुण्यात येत असल्याचे तिने तिच्या कुटुंबियाने सांगितले होते. पुण्यातील वानवडी भागात पुजा राहात होती. पुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचीही माहिती मिळत आहे. पण, अचानक एक दिवस पुजाने इमारतीवरुन उडी मारुन तिचे आयुष्य संपविले. तिच्या डोक्याला आणि मनक्याला ईजा झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?

पुजा चव्हाण हिने आत्महत्येचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आत्महत्येमध्ये विदर्भातील एका मंत्र्याचा संबध असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपकडूनही तसा आरोप केला जात आहे. दरम्यान, सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या आत्महत्या प्रकरणाशी संबध असल्याचे चर्चा सुरु आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com