पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर कोण? प्रश्न अजूनही कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

पुणे​ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर कोण ?अंकिता पाटील की दत्ता झुरंगे याबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीत बहुमत न झाल्याने आजची नियोजीत सर्वसाधारण सभा तब्बल एक तासाच्या प्रतीक्षेनंतर अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. या निवडीवरून काँग्रेसमध्ये तीन गट पडले. 

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर कोण ?अंकिता पाटील की दत्ता झुरंगे याबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीत बहुमत न झाल्याने आजची नियोजीत सर्वसाधारण सभा तब्बल एक तासाच्या प्रतीक्षेनंतर अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली. या निवडीवरून काँग्रेसमध्ये तीन गट पडले. 

अध्यक्ष सभागृहात येण्यापुर्वीच विरोधी पक्षांनी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांची प्रभारी अध्यक्षपदी निवड करत अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या अनुपस्थितीतच सभा सुरू झाल्याची घोषणा केली आणि कामकाज सुरु झाल्याचे जाहीर केले. पण सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि सभेचे सचिव महादेव घुले यांना सभागृहात पुरेशी गणसंख्या नसल्याने कामकाज सुरू करता येणार नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.त्यानंतर अध्यक्ष देवकाते तातडीने सभागृहात दाखल झाले आणि आजची सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्याची  घोषणा त्यांनी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is on president of the standing committee of the Pune District council yet not decided