Pune Wall Collapse : त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण?

Pune wall collapse.jpeg
Pune wall collapse.jpeg
Updated on

पुणे : पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेच 15 जणांचा मृत्यू झाला आता त्यांच्या मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण संबंधित घटनेस बांधकाम व्यावसायिकाचा बेजबाबदारपणाच कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे.

बांधकाम सुरु असलेल्या या सोसयटीमध्ये कामगारांना राहण्यासाठी बांधलेले 'ट्रांझिट कॅम्प हे सुरक्षित ठिकाणी बांधण्याऐवजी सोसायटीच्या संरक्षक भिंतीस लागूनच त्यांच्या झोपड्या बांधल्या गेल्या. त्यामुळेच या दुर्घटनेत जास्त जिवीतहानी झाली. या ट्रांझिट कॅम्पची तपासणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक होते. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे बिल्डर व महापालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे.

लहानग्यांचा मृत्यू जीवाला चटका लावणारा!

अवघ्या सहा वर्षांचा रेखाल शर्मा, 10 वर्षांचा अजित शर्मा, पाच वर्षांचा ओवीदास व आठ वर्षांची सोनाली देवी ही सगळी बच्चे कंपनी आपले आई-वडिल कामाला गेल्यावर एकत्र खेळत होती. कधी-कधी आई-वडिलांना त्यांच्या कामात आपल्या चिमुकल्या हातांनी मदतही करीत होती. सकाळी-सायंकाळी झोपडयांसमोरील मोकळ्या जागेत मनसोक्त बागडत होती. शुक्रवारी सायंकाळी ते सर्वजण एकत्र खेळले ते शेवटचे. त्याच रात्री त्यांना झोपेत मृत्यूने गाठले. बालपण उमलण्यापूर्वीच नियतीने त्यांना हिरावून नेले. त्यांच्या मृत्यूचा तेथील नागरिकांच्या जिवाला मात्र चांगलाच चटका लागला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com