फक्त देवेंद्र फडणवीसच लक्ष्य का? : चंद्रकांत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

आज (बुधवार) पुण्यातील कोथरुड मतदारसंघात विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. 

पुणे : सिंचन गैरव्यवहारात अजित पवार यांच्याविरोधात गाडीभर पुरावे देण्यात आमच्यासोबत शिवसेनाही होती. त्यांनीही अजित पवारांना दोषी म्हटले होते. मग, गाडीभर पुराव्यांवरून फक्त देवेंद्र फडणवीस यांनाच का लक्ष करण्यात येत आहे, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज (बुधवार) पुण्यातील कोथरुड मतदारसंघात विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. 

चंद्रकांत पाटील म्हणाले : 
- मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जातोय हे त्या त्या पक्ष प्रमुखांना विचारण्यात यावे
- ज्यावेळी तीन दिवसांचे सरकार होते, तेव्हा अजितदादांवरील केसेस मागे घेण्यात आल्या. पण तसे काही नाही. त्यावेळी रुटीन प्रोसेस होते.
- नवीन सरकारने सूचना दिल्या, की तपासण्या अधिकाऱ्यांने स्वतः केलं पण त्याने वेगवेगळ्या विषयात अजित पवार दोषी नाहीत असा रिपोर्ट दिला. या सरकारने असे का केलं, या सरकारमध्ये शिवसेना मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे शिवसेनेला विचारण्याचा प्रश्न आहे, की की आता अजित पवार दोषी नाहीत का? गाडीभर पुराव्यांमध्ये फक्त देवेंद्र यांना लक्ष करण्याची गरज नाही.

आता मोहिते पाटील म्हणतात, 'मी अजूनही राष्ट्रवादीतच'

- सोशल मीडियावरून मुंडन करण्याऱ्याला मुख्यमंत्री पाठीशी घालणार नाहीत. कायद्याचे राज्य चालत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अशा गोष्टींना आळा नाही घातला तर ग्रामीण म्हणींप्रमाणे म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावेल.
- दोन लाखांची कर्जमाफी ही फसवणूक,त्यांनी जो शब्द दिला होता. त्यामध्ये शुद्ध फसवणूक, उद्धव ठाकरे यांनी यू टर्न मारला. उद्धवजी टर्न यु यु अस होणार, प्रत्येक गोष्टीत यु टर्न मारतात.2001 ते 2016 शेतकरी कर्जमाफीला राहिला नाही. त्यामुळे दोन लाखांच्यावरचे शेतकरी राहिले आहेत.
- शिवथाळी योजना स्वागत पण यात भ्रष्टाचार झाला तर पाहू.
- पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांची नाराजी पक्षाची नाही. ती एखाद्या व्यक्ती ,घटना यांच्याबद्दल आहेत. या नाराज्या एकत्र बसून मांडायच्या असतात. आमच्या नेत्याच्या काळजी आमचा पक्ष घेईल, त्यांना कोणी ऑफर देत असेल तर त्यांनी त्यांच्या त्याच्या पक्षातील लोकांची काळजी करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why all the time Devendra Fadnavis targeted by all asked Chandrakant Patil