Pune News : ‘असलं थर्ड क्लास सुशासन आम्हाला नको, मुरलीधर मोहोळांना प्रवाशाने का सुनावलं; केंद्र सरकारच्या कारभारावरही व्यक्त केली नाराजी

विमानसेवेच्या भोंगळ कारभारावरून प्रवाशाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सुनावले.
passenger navneet mandhana and murlidhar mohol

passenger navneet mandhana and murlidhar mohol

sakal

Updated on: 

पुणे : विमानसेवेच्या माध्यमातून छोट्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्याच्या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडाण योजनेच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे–नांदेड आणि नांदेड–पुणे विमान प्रवासादरम्यान आलेल्या कथित त्रासदायक अनुभवामुळे नवनीत मानधना यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. विमानाच्या वेळापत्रकात वारंवार बदल, ऐनवेळी विमान रद्द झाल्याची माहिती आणि तक्रारी करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत त्यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी केवळ विमान कंपनीच्या कारभारावरच नव्हे, तर केंद्र सरकारच्या सुशासनाच्या दाव्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...