पाणीपुरी न विचारता का आणली? रागाच्या भरात पुण्यात पत्नीची आत्महत्त्या

पाणीपुरी न विचारता का आणली? रागाच्या भरात पुण्यात पत्नीची आत्महत्त्या

पुणे : पाणीपुरी न विचारता का आणली? असा वाद झाला आणि रागाच्या भरात पत्नीने आत्महत्येचा पर्याय निवडला. ही धक्कादायक घटना घडली आहे पुण्यामध्ये. या प्रकरणी आता भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यामध्ये पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक देखील करण्यात आली आहे. प्रतिक्षा गहिनीनाथ सरवदे (वय 23) असं आत्महत्त्या केलेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पती गहिनीनाथ सरवदे (वय 33) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्षाचे वडील प्रकाश भिसे यांनी तक्रार दाखल केली होती.

पाणीपुरी न विचारता का आणली? रागाच्या भरात पुण्यात पत्नीची आत्महत्त्या
तीन महिन्यांच्या मुदतीत 40 मजली ट्विन टॉवर्स पाडा - सुप्रीम कोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील पती गहिनीनाथ हा मूळ सोलापूर जिल्ह्यातील आहे. 2019 मध्ये त्याचा विवाह प्रतिक्षासोबत झाला होता. त्या दोघांनाही एक मुलगा आहे. मात्र, त्यांच्यात घरगुती कारणास्तव सतत वाद होत होते. काही दिवसांपूर्वीच गहिनाथ याने पत्नीला पुण्यात आणले होते. ते दोघेही आंबेगाव पठार येथे राहत होते.

पाणीपुरी न विचारता का आणली? रागाच्या भरात पुण्यात पत्नीची आत्महत्त्या
हे काय स्वातंत्र्यासाठी केलेले आंदोलन नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ याने ऑफिसवरून येताना पाणीपुरीचे पार्सल आणले होते. त्यावेळी मला न विचारता पाणीपुरी आणल्याचा पत्नी प्रतिक्षाला राग आला आणि तिने पाणीपुरी खाण्यास नकार दिला. पाणीपुरीवरुन दोघांमध्ये टोकाचे वाद झाले. त्यानंतर पतीने कामावर जाताना डबा नेण्यास नकार दिला. यातूनच प्रतिक्षाने विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर तिला गंभीर अवस्थेत एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शनिवारी (दि.28) दुपारी तीनच्या सुमारास प्रतिक्षाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com