esakal | पतीने पाणीपुरी न आणल्यानं पुण्यात पत्नीची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

pune

पतीने पाणीपुरी न आणल्यानं पुण्यात पत्नीची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पतीने पाणीपुरी आणल्यानंतर त्यावरूनच पती-पत्नीमध्ये भांडणे झाली. या भांडणाच्या रागातून पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी आंबेगाव पठार परिसरात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

प्रतिक्षा सरवदे (वय २३, रा. सिंहगड व्हिला, आंबेगाव पठार) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर गहिनीनाथ अंबादास सरवदे (वय ३३) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. गहिनीनाथ व प्रतिक्षाचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. गहिनीनाथने पत्नीला खाण्यासाठी पाणी पुरी आणली होती. मात्र, प्रतिक्षाने पाणी पुरी खाल्ली नाही. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे झाली.

loading image
go to top