Murlidhar Mohol Meeting
sakal
पुणे - केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असताना गेल्या तीन वर्षांत शहरातील पाणी साठणारी ठिकाणे किती कमी केली? ज्या ठिकाणी काम केले तेथे पाणी का साचते? असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय नागरी विमानवाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज महापालिका प्रशासनाची कडक शब्दांत झाडाझडती घेतली. पुणेकरांना पावसाळ्यात समस्या निर्माण होईल, असे एकही ठिकाण शहरात नको, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.