बेकरी उद्योगासाठी पाच लाख रूपये आण म्हणून विवाहितेला घरातून हाकलले

बेकरी उद्योगासाठी पाच लाख रूपये आण म्हणून विवाहितेला घरातून हाकलले
Published on

पाच लाखांसाठी विवाहितेला हाकलले

बेकरी उद्योग टाकायला पैशांसाठी माहेरच्यांकडे लावला तगादा

सोलापूर, ता. १६ ः बेकरी उद्योगासाठी माहेरहून पाच लाख रूपये न आणल्याने पतीसह चौघांनी विवाहितेस मारहाण करून घरातून हाकलले. १८ जानेवारी २०२६ रोजी मुरारजी पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी त्या चौघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पती सोमनाथ माळी, सासू गौराबाई माळी, दीर सतीश माळी, जाऊ मीनाक्षी माळी (सर्व रा. मुरारजी पेठ) यांचा त्यात समावेश आहे. यातील फिर्यादी ज्योती सोमनाथ माळी (वय २९, रा. अवंती नगर, जुना पुणे नाका) हिचा सोमनाथ माळी याच्याशी विवाह झाला. त्यानंतर ती २३ जून २०२३ पासून नांदण्यास सासरी गेली. पती सोमनाथ याच्यासह सासरच्या मंडळींनी बेकरी उद्योगासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणायला सांगितले. लग्नात हुंडा दिला नसल्याचे सांगत पैसे आणण्यासाठी तगादा लावला. तिने पैसे न आणल्याने त्यांनी बऱ्याचदा सांगूनही तू आमचे ऐकत नाही, त्यामुळे घरातून निघून जा, जोपर्यंत पैसे आणत नाही तोपर्यंत नांदण्यास येऊ नको, असे सांगितले. त्यानंतरही तिने पैसे न आणल्यास संशयितांनी तिला हातांनी मारहाण करून तिला घरातून हाकलून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com