आर्थिक मदतीच्या अपेक्षेने छळ; उपाशी ठेवून शारीरिक त्रास

आर्थिक मदतीच्या अपेक्षेने छळ; उपाशी ठेवून शारीरिक त्रास
Published on: 

पैशासाठी पत्नीचा छळ;
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : येथील पश्चिम मंगळवार पेठेतील श्रुती पट्टणशेट्टी (वय ३१) यांना फेब्रुवारी २०१९ ते १५ नोव्हेंबर २०२६ या काळात पती निखिल पावडबसप्पा पट्टणशेट्टी व बसम्मा ऊर्फ हर्षा पावडबसप्पा पट्टणशेट्टी (दोघेही रा. फुरसुंगी, पुणे) यांनी छळ केला. आर्थिक मदतीची अपेक्षा ठेवून त्यांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. संशय घेऊन टोमणे मारून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच उपाशी ठेवल्याची फिर्याद श्रुती पट्टणशेट्टी यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली. यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलिस हवालदार बिरकुटे तपास करीत आहेत.
-------
बीबी दारफळ येथील
महिला गुरुवारी बेपत्ता
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील दुसरी शिक्षण झालेली ३० वर्षीय महिला १२ नोव्हेंबरला बेपत्ता झाली. त्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास केगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळून तिचे कोणीतरी अपहरण केल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलिस त्या महिलेचा शोध घेत आहेत.
-----
पती घरातून बेपत्ता;
पत्नीची पोलिसांत धाव
सोलापूर : बाळे येथील मारुती गल्ली परिसरात राहायला असलेला कल्लेश्वर रमेश पुजारी (वय ३६) हा तरुण काही दिवसांपूर्वी राहत्या घरातून निघून गेला आहे. घरात कोणाला काहीही न सांगता तो २० ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या सुमारास घरातून बाहेर गेला. त्यानंतर तो पुन्हा घरी आलाच नाही. त्याचा मोबाईल बंद असून कुटुंबीयांनी इतरत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. त्यामुळे या तरुणाच्या पत्नीने फौजदार चावडी पोलिसांत धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.