डॉक्टर महिलेचा सासरी छळ, पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

डॉक्टर महिलेचा सासरी छळ, पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Published on: 

डॉक्टर महिलेचा सासरी छळ

पतीसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

राहुरी, ता. १३ : पतीचा दवाखाना सुरू करण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणि लग्नातील छायाचित्रकाराचे दीड लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित डॉक्टर महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात पती, सासू आणि दीर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन दीपचंद शर्मा (पती), सुमनलता दीपचंद शर्मा (सासू), रितीक दीपचंद शर्मा (दीर, सर्वजण रा. बिसलपूर, जि. जोधपूर, राजस्थान), अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अर्पिता नितीन शर्मा (वय २८, रा. जोधपूर, सध्या रा. वांबोरी, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे.

५ मार्च २०२५ रोजी जोधपूर येथे नितीन शर्मा यांच्याशी विवाह झाला. विवाहाच्या आठ दिवसांनंतर सासू व दीर घरगुती कारणावरून त्रास देऊ लागले. लग्नात मागणीप्रमाणे पैसे दिले नसल्याचे सांगून छायाचित्रकाराचे दीड लाख रुपये, तसेच पतीचे दंत चिकित्सालय सुरू करण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, वडिलांनी कर्ज काढून लग्न केल्याचे सांगितल्यावर शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. पतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. लग्नानंतर १५ दिवसांनी माहेरी परतले. वडिलांनी सासरच्या मंडळींशी संपर्क साधल्यानंतर पुन्हा सासरी नेण्यात आले; मात्र पैशांसाठी छळ सुरूच राहिला. माहेरी फोन करण्यास व मोबाईल वापरण्यास मनाई, जेवण न देणे आणि तक्रार केल्यास चारित्र्याबाबत बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. जून २०२५ मध्ये मारहाण करून चाकूचा धाक दाखविल्यानंतर भावासोबत माहेरी आले. डिसेंबर २०२५ मध्ये मध्यस्थांमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र यश आले नाही. माहेरी राहत असतानाही फोनवरून शिवीगाळ व धमक्या दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com