
झोपेतच नवऱ्याचा गळा आवळला, पुण्यात पत्नीचा आत्महत्येचा बनाव उघड
पुण्यातील उत्तमनगर भागात एका पत्नीने नवऱ्याचा खून करून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. पती सतत चारित्र्यावर संशय घेत असल्याने हे कृत्य केल्याचं महिलेने कबूल केलं आहे. (Wife Killed his Husband in Pune)
राहत्या घरी झोपेत असलेल्या पतीचा दोरीने गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. रमेश मिसे व नंदिनी मिसे असे पती पत्नीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झालं होतं. पती दारुच्या नशेत झोपलेला असतानाच त्याचा काटा काढायचा डाव पत्नीने रचला. (Pune Crime News)
पती वांरवार चारित्र्यावर संशय घेतो. हा राग तिच्या मनात होता. पती मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पत्नीने पाहिलं. यानंतर नंदिनीने त्याच्या गळ्यात दोरी टाकून ती दोरी लोखंडी हुकाला बांधली. यानंतर पतीला लटकवून गळफास घेतल्याचा बनाव रचला.
ही दुर्घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तपासाला सुरुवात झाली. आत्महत्या असल्याचं पत्नी सांगत होती. मात्र सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांना बायकोचा बनाव लक्षात आला आणि संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. पोस्टमार्टममध्ये रमेशचा गळा आवळून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. यासंबंधी डॉक्टरांनी अहवाल देखील दिला. त्यानंतर सखोल चौकशी झाली. त्यात बनाव असल्याचं समोर आलंं. विशेष म्हणजे असाच प्रकार काही दिवसांपूर्वी कात्रज भागात घडला होता.
Web Title: Wife Killed Husband By Hanging Rope In Pune Pune Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..