
कोरोनामुळे निवडणकीच्या निकालानंतर विजयाची मिरवणूकीला बंदी घालण्यात आली आहे. निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर जल्लोष तर होणारच! खेड तालुक्यात पाळू येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पती संतोष शंकर गुरव हे निवडून आले. त्यानंतर उत्साहाच्या भरात त्यांची पत्नी रेणूका हfने त्यांना खांद्यावर उचलून घेत त्यांची मिरवणूक काढली.
चाकण(पुणे) : ग्रामपंचायत निवडणूकांच्या निकालानंतर सगळीकडेच जल्लोषाचे वातावरण आहे. गुलालाची उधळण, विजयाची मिरवणूक, समर्थंकाचे जल्लोषात सुरु असेलेला डान्स असे चित्र सध्या सर्वत्र आहे. पण सध्या सोशल मिडियावर ग्रांमपचायत निवडणूकीच्या विजयानंतरचा एक भन्नाट फोटो व्हायरल होत आहे. पुणे जिल्ह्यातील एका ग्रामपंचायत निवडणूकीत पती निवडून आल्यानंतर पत्नीने चक्क खांद्यावर उचलून पतीची मिरवणूक काढली आहे. पतीच्या विजयाचा जल्लोष पत्नीने हटके पध्दतीने केला आहे. पतीला खांद्यावर बसवून गावात आनंदाने मिरवणूक काढली आहे.
PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी
इलेक्शनचा विलक्षण फोटो : बायको असावी तर अशी !
खेड तालुक्यात पाळू येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पती संतोष शंकर गुरव हे निवडून आले. त्यानंतर उत्साहाच्या भरात त्यांची पत्नी रेणूका हिने त्यांना खांद्यावर उचलून घेत त्यांची मिरवणूक काढली.#Sakal #sakalNews #ViralVideo #pune pic.twitter.com/sKNDh58uR8— sakalmedia (@SakalMediaNews) January 19, 2021
कोरोनामुळे निवडणकीच्या निकालानंतर विजयाची मिरवणूकीला बंदी घालण्यात आली आहे. निवडणूकीत विजय मिळाल्यानंतर जल्लोष तर होणारच! खेड तालुक्यात पाळू येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पती संतोष शंकर गुरव हे निवडून आले .त्यानंतर उत्साहाच्या भरात त्यांची पत्नी रेणूका हfने त्यांना खांद्यावर उचलून घेत त्यांची मिरवणूक काढली. पत्नीचा उत्साह त्याचा व्हायरल झालेला व्हिडीओ हे पाहून पत्नीच आता विजयावेळी पतीला उचलताहेत आणि जल्लोष साजरा करताहेत हे दिसून आले.
लग्नकार्य उरकल्यानंतर कुलदेवतांचे दर्शन पती, पत्नी घेण्यासाठी गेल्यानंतर पती हा पत्नीला खांद्यावर उचलून घेतो. जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर पाच पायऱ्या पत्नीला उचलून घेतो अशी प्रथा आहे. आता निवडणूकीत पतीच्या विजयानंतर पत्नीने पतीला खांद्यावर उचलून घेत विजयोस्तव साजरा केला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा