पाटण, कलिंगड पिकाचे गव्यांकडून नुकसान

पाटण, कलिंगड पिकाचे गव्यांकडून नुकसान

Published on

रानगव्यांनी घातला कलिंगडात धुमाकूळ

राममळा येथील प्रकार; एका एकरातील अडीच लाखाचे नुकसान

पाटण, ता. २४ ः कोयना विभागातील राममळा येथील एक एकर क्षेत्रात विक्रीसाठी तयार झालेले कलिंगडांचे पीक सोमवारी रात्री रानगव्यांनी फस्त केल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्याने दिवस- रात्र केलेले कष्ट वाया गेले. यात निळकंठ आनंदा भिंगारदिवे या शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. या पिकाच्या भरवशावर मुलीला एमबीएला प्रवेश व लॅपटॉप घेण्याचे त्यांचे स्वप्नही भंग पावले. वन विभाग व महसूल विभागाने नुकसानीची पाहणी व पंचनामा केला आहे.
याबाबत माहिती अशी, निळकंठ भिंगारदिवे हे शेतीत नवनवीन प्रयोग राबवून आपल्या संसाराचा गाढा हाकतात. पत्नी, दोन मुली व मुलगा असे कुटुंबात सदस्य आहेत. यावर्षी रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर राममळा येथे एक एकर क्षेत्रात कलिंगड पीक घेतले होते. गेली तीन महिने त्यांनी या पिकाची देखभाल केली होती. चार दिवसांत कलिंगड तोडणीचे नियोजन होते. सध्या किलोला साधारण २५ रुपये दर आहे. मात्र, सोमवारी रात्री १३ ते १५ रानगव्यांच्या कळपाने कलिंगड पिकात धुमाकूळ घातला. रात्रीत संपूर्ण कलिंगड फळे व वेल फस्त केले. सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेल्यावर श्री. भिंगारदिवे यांच्या ते निदर्शनास आले. तीन महिने केलेले कष्ट डोळ्यासमोर वाया गेल्याचे पाहून श्री. भिंगारदेवे आवक झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता. त्यांनी सहकारी शेतकऱ्यांना ही बाब सांगितली. सहकाऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधला.
तातडीने सहाय्यक वन संरक्षक जयश्री जाधव, पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, मंडलाधिकारी संजय जंगम, ग्राम महसूल अधिकारी नीलेश भाग्यवंत, माजी सभापती राजाभाऊ शेलार, रवी पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, सरपंच एकनाथ जाधव, रमेश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसानीचा पंचनामाही केला.

.........


चाैकट
......

स्वप्नांवर फिरले पाणी...

श्री. भिंगारदिवे यांची मुलगी श्रेया ही बीकॉम आयटीच्या शेवटच्या वर्षाला आहे. बीकॉम झाल्यावर तिला एमबीएला प्रवेश व त्यासाठी लॅपटॉप घेण्याचे श्री. भिंगारदिवे यांचे नियोजन होते. त्यांच्या या स्वप्नांवर रानगव्यांनी पाणी फेरले.
...................................

A01231,
किंवा
A01229,

राममळा ः कलिंगड पिकाची रानगव्यांच्या कळपाने केलेले नुकसान.
.....................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com