Wildlife Festival : शास्त्रीय संज्ञा अवतरल्या चक्क गोष्टीरूपात! ‘वाइल्डलाइफ फेस्टिव्हल’ला मुलांसह मोठ्यांचाही प्रतिसाद
Pune Wildlife : पुण्यातील ‘वाइल्डलाइफ फेस्टिव्हल फॉर किड्स’ या कार्यक्रमात मुलांना निसर्ग, प्राणी आणि पक्ष्यांचे महत्त्व गोष्टी आणि आवाजाच्या माध्यमातून समजावले गेले.
पुणे : वन्यजीव, झाडे, वेली, माती, पाणी अशा शास्त्रीय परिभाषेत अडकलेल्या पारिभाषिक संज्ञा मुलांसाठी शनिवारी सायंकाळी गोष्टीरूपात अवतरल्या. त्या ऐकताना मुलांप्रमाणे मोठेही गुंग झाले. निमित्त होते ‘वाइल्डलाइफ फेस्टिव्हल फॉर किड्स’ या कार्यक्रमाचे.