Vidhan Sabha 2019 : भानुप्रताप बर्गेंचा निशाना लागणार का? 

bhaupratap-barge.jpg
bhaupratap-barge.jpg

पुणे : सेवानिवृत्त पोलिस अधिकारी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करून विधासभेसाठी 'नेम' साधला आहे. आता पुण्यातून भानुप्रताप बर्गे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलीच शिवाय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याने बर्गेंचा निशाना लागणार का? हे पहावे लागणार आहे.


भानुप्रताप बर्गे हे पुणे गुन्हे शाखेतून सहाय्यक पोलिस आयुक्तपदावरून गेल्याच महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. त्यापुर्वीपासूनच त्यांची विधासभेची चर्चा सुरू होती. ते सेवेत असतानाच वाढदिवसानिमित्त शहराच्या सर्वच भागात 'पुढील वाटचालीस शुभेच्छा' असे मोठे फ्लेक्‍स लागले होते. 

बर्गे हे शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती. मागच्या आठवड्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. बर्गे यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही. त्यामुळे ते कोणत्या पक्षाकडून की, अपक्ष लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 


बर्गे म्हणाले, ''मी भाजप नेत्यांची भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. शिवाजीनगरमधून मी विधानसभा निवडणुक लढवावी यासाठी आज सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यांनी मला मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com