'मुर्दाड सरकारचे सर्वपित्री आमवास्येला’ श्राद्ध घालणार – राष्ट्रशक्ती संघटना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

कात्रज - पॅनकार्ड क्लब्ज कंपनीकडून फसवणूक झालेले देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदारांना न्यायापासून वंचीत ठेवणार्या सरकारचे श्राध्द आझाद मैदानावर सर्वपित्री आमावस्येला घालण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी केला.

कात्रज - पॅनकार्ड क्लब्ज कंपनीकडून फसवणूक झालेले देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदारांना न्यायापासून वंचीत ठेवणार्या सरकारचे श्राध्द आझाद मैदानावर सर्वपित्री आमावस्येला घालण्याचा निर्धार राज्यभरातून आलेल्या प्रतिनिधींनी केला.

पॅनकार्ड क्लब्ज कंपनीतील गुंतवणूकदार प्रतींनिधींचा राज्यव्यापी मेळावा गुरूवारी आंबेगाव बुद्रुक येथे पार पडला. यावेळी झालेल्या प्रदिर्घ चर्चेनंतर ९ ऑक्टोबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर सर्वपित्री आमवास्येला सरकारचे श्राद्ध घालण्याची घोषणा करण्यात आली. देशभरातील ५५ लाख गुंतवणूकदार व त्यापैकी राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदारांची फसवणूक पॅनकार्ड क्लब्ज कंपनीने केली आहे. सेबीच्या कारवाईत होत असलेली दिरंगाई गुंतवणुकदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. दोन वर्षापासून राष्ट्रशक्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक येथे अनेक मोठी आंदोलने झाली आहेत. राष्ट्रशक्ती संघटनेच्या प्रयत्नातून राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळाने दि.२१ डिसेंबर २०१७ रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून वस्तुस्थिती जाणिव करून देण्यात आली होती. मात्र या प्रयत्नांना अद्यापही यश मिळालेले नाही. राज्यातील सुमारे ३८ खासदारांच्या घरासमोर गुंतवणूकदारांनी घंटानाद आंदोलन केले होते. राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा करू असे आश्वासन हिवाळी अधिवेशनदारम्यान सभागृहात दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या विषयावर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही.आजवर पॅनकार्ड क्लब्ज कंपनीच्या मिळकतींचा ९ वेळा लिलाव झाला आहे. मिळकती विकत घेण्यासाठी ग्राहक मिळत नाही, ही कारणे वेळोवेळी देवून दिशाभूल केली जात आहे. मात्र राज्यातील ३५ लाख गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यात सरकार प्रामाणिक नाही. दोन वर्षे आंदोलन करूनही निर्णायक तोडगा निघत नाही. या स्थितीत गुंतवणूकदारांचे संसार उघड्यावर आले आहेत.ज्या सरकारच्या संवेदना गोठल्या आहेत, ते सरकार मृत झाले असून त्यांचे श्राद्ध घालायची वेळ आली आहे असा ठराव या मेळाव्यात करण्यात आला.या पार्श्वभुमीवर मंगळवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर या सरकारचे श्राद्ध घालण्यासाठी राज्यातील गुंतवणुकदारांनी सज्ज राहावे, असे अवाहन राष्ट्रशक्ती संघटनेचे प्रमुख ज्ञानेश्वर दारवटकर यांनी केले. सभागृहात सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. जनता त्रस्त झाली असून याचे परिणाम सरकारला येणार्‍या निवडणुकीत मोजावे लागतील असा इशारा इन्वेस्टर्स वेल्फेअर फोरम चे अध्यक्ष नंदकुमार गावडे यांनी दिला. उपस्थीत तज्ञ प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले. 

या मेळाव्यासाठी अहमदनगर, औरंगाबाद, भुसावळ, जळगाव, नाशिक, धुळे, कोल्हापूर, सातारा, सांगली, विटा, बेळगाव, गडहिंग्लज, सिंधुदुर्ग, गोवा व मुंबई येथून बहुसंख्य गुंतवणुकदार प्रतिनिधी उपस्थित होते. संघटनेचे पदाधिकार्यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते. इन्वेस्टर्स वेल्फेअर फोरमचे सचिव मुगुटराव यांनी सूत्रसंचालन केले तर आभार फोरमचे अध्यक्ष नंदकुमार गावडे यांनी मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will do governments shraddha - rashtrasakhti sanghatana