वस्त्यांमधील बालविवाह उच्चाटनासाठी प्रयत्नशील राहणार : डॉ. सिध्दार्थ धेंडे

yerwada
yerwada

येरवडा : महापालिकेच्या सामाजविकास विभागाच्यावतीने शहरातील वस्त्यांमध्ये बालविवाह विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. शेजारसमुह, स्वयंसहाय्यता बचत गट, संयोगिनींच्या माध्यमातून शहरातील बालविवाहाचे उच्चाटन करण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. 
विश्रांतवाडी चौकातील मुुकुंदराव आंबेडकर चौकात निर्माण बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने बालविवाह विरोधी अभियानाची सुरवात करताना डॉ. धेंडे बोलत होते. यावेळी निर्माण संस्थेचे वैशाली भांडवलकर, संतोष जाधव, युनिसेफचे प्रतिनिधी जयंत पवळीकर, माजी नगरसेवक सतिश म्हस्के, सुनिल सांळुखे उपस्थित होते.
 
डॉ. धेंडे म्हणाले, ‘‘ पुणे शहर विद्यचे माहेरघर असताना येथे बालविवाह होत आहेत. ही खेदाची बाब आहे. विशेषत: शहरातील वस्त्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आहे. त्यासाठी बालविवाह रोखण्यासाठी सामाजविकास विभागाची मदत घेण्याचा ठराव करण्यात येईल. पोलिसांनी बालविवाह रोखण्यासाठी त्यांच्या हद्दीतील भटजी, बँडवाले, मंगल कार्यालय आदींची माहिती संकलीत करण्याची गरज आहे. तरच बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अमंलबजावणी होईल.’’

भांडवलकर म्हणाल्या, ‘‘बालविवाह प्रतिबंध कायद्याची अमंलबजावणी होऊन अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे औचित्य साधून बालविवाह प्रतिबंधक संदर्भात भिंत्तीपत्रकाचे प्रकाशन केले आहे. शहरातील वस्त्यांमध्ये १ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान बालविवाह विरोधी अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत वस्त्यांमध्ये पथनाट्य, विवाहाशी संबंधित भटजी, बँडवाले, मुद्रणालय, केटरिंग, मंगलकार्यालय, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, बालविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका यांच्याबरोबर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. शाळेत चित्रकला स्पर्धा, बालविवाह संदर्भात लघुपट दाखविण्यात येणार आहे.’’

पुणे जिल्ह्यात १९.४ टक्के बालविवाहचे प्रमाण
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या २०११ च्या जनगणनेसार राज्यातील १६ जिल्ह्यांत बालविवाहचे प्रमाण जास्त आहे. पुणे जिल्ह्यात दहा ते सतरा वयोगटातील मुलींच्या बालविवाहचे प्रमाण हे १९.४ टक्के असल्याचे निर्माण संस्थेचे संतोष जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com