MP Murlidhar Mohol
sakal
पुणे - पुणे महापालिकेत एकहाती सत्ता येऊन सहा महिने होत असताना भाजपला अजूनही सत्ता राबविता येत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. शिवाय निविदांमधील वाद, सभागृहात बोलण्यासाठी पुरेशी संधी न मिळणे यावरून नगरसेकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. पक्षांतर्गत या धुसफूशीवर वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी गेल्या आहेत. पुण्यातील पदाधिकारी व नगरसेवकांचे रिपोर्टकार्ड हे चांगले नसल्याने भाजपने आता केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. ही बैठक उद्या (ता. ९) होत असून, यात या धुसफुशीचा सोक्षमोक्ष लागणार का? याकडे लक्ष लागले आहे.