माझे वडील परत येतील का?

मंत्रालयात आत्महत्या केलेल्या सुभाष जाधव यांच्या मुलाचा सवाल
Suicide
Suicidesakal
Updated on

पुणे : ‘‘न्याय्य हक्क मिळण्यासाठी माझे वडील सुभाष सोपान जाधव (वय ५०, रा. जाधववाडी, ता. आंबेगाव) हे मुंबईत मंत्रालयासमोर गेले होते. नैराश्यातून त्यांनी तेथे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिस व शासकीय यंत्रणा हलली. आता संबधितांवर गुन्हेही दाखल होतील. पण, आता माझे वडील पुन्हा परत येतील का,’’ असा प्रश्‍न सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश जाधव यांनी प्रसार माध्यमांसमोर उपस्थित केला.

मंत्रालयासमोर शुक्रवारी (ता. २०) विषारी औषध घेतल्याने शेतकरी सुभाष जाधव हे अत्यवस्थ झाले होते. मुंबईत सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी (ता. २२) त्यांचे निधन झाले. जाधववाडी येथे सोमवारी (ता. २३) अंत्यविधी झाला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांचे पुत्र गणेश जाधव म्हणाले, ‘‘माझे वडील व कुटुंबातील सदस्य सावकार व पोलिसांच्या अन्यायामुळे त्रस्त झाले होते. गेली वर्षभर अन्याय सहन केला. न्याय मागण्यासाठी मंचर पोलिस, उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, विशेष महापरिक्षेत्र पोलिस अधिकारी व मंत्रालयात पत्रव्यवहार केला. भेटी घेतल्या. पण, न्याय मिळाला नाही.’’

Suicide
पुणेकरांनो, धोका कायम आहे!

दरम्यान, मुंबई येथील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गणेश जाधव यांनी दिलेल्या जबाबात नमूद केले आहे की, विलास सहादु शिंदे याने ठरल्याप्रमाणे १७ गुंठे जमिनीचे खरेदीखत करताना माझ्या वडिलांची दिशाभूल करून त्यांच्या नावावर असलेल्या एकूण २८ गुंठे जमिनीचे खरेदीखत स्वतःच्या नावावर करून घेतले. त्याने ठरल्याप्रमाणे जमिनीचा व्यवहार पूर्ण न करता कर्जाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम आम्हाला न देता सुभाष जाधव यांच्या नावे असलेली एक एकर जमिनीचे खरेदीखत त्यांनी त्यांची पत्नी सुशीला सुरेश जाधव यांच्या नावे करून घेवुन फसवणूक केली आहे. २८ गुंठे जमिनीचा ताबा मिळण्याकरिता तगादा लावून सुभाष जाधव यांना व कुटुंबीयांना मानसिक, शारीरिक त्रास दिला. संबंधितांच्या त्रासाला कंटाळून वडील सुभाष जाधव यांनी आत्महत्या केली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune citizens can now suggest development projects for the PMC's 2027–28 Budget. Proposals can be submitted until August 31.
Despite a civic notice, mud from a construction site once again spread across Rajabahadur Mill Road in Pune, forcing the fire brigade to clean the stretch after vehicles skidded.
Pune Mayor Manjusha Nagpure claims the city has fewer potholes this monsoon than last year, even as road repair work continues across the city.
Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com