DCM Sunetra Pawar
sakal
माळेगाव - एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती, दुसरीकडे पाण्याअभावी कोमेजणारी उभी पिके आणि हाताशी आलेला ऊस वाळण्याची भीती... अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी नीरा डाव्या कालव्याच्या पाणीवाटपाचा प्रश्न आज माळेगावात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमोर मांडला.