esakal | कामगार दिनानिमित्त कामगारांच्या लसीकरणाचा खर्च करणार; पुण्यातील 3 व्यावसायिकांचा निर्णय

बोलून बातमी शोधा

कामगार दिनानिमित्त कामगारांच्या लसीकरणाचा खर्च करणार; पुण्यातील 3 व्यावसायिकांचा निर्णय

कामगार दिनानिमित्त कामगारांच्या लसीकरणाचा खर्च करणार; पुण्यातील 3 व्यावसायिकांचा निर्णय

sakal_logo
By
नीलेश कांकरिया

वाघोली : कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लसीकरण हाच पर्याय आहे. केंद्र सरकार बरोबर राज्य सरकारने ही मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. 18 वर्षांपासून पुढे आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सरकार मोफत लसीकरण करणार असले तरी वाघोली व परिसरातील तीन व्यावसायिकांनी मात्र कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहिमेला हातभार लावण्यासाठी फुल ना फुलांची पाकळी म्हणून आपल्या कामगारांबरोबर अन्य काही जणांचा लसीकरणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीला ही रक्कम ते देणार आहेत. संतोष पायगुडे ( देशमुख ), भावडीचे माजी सरपंच राहुल तांबे व आव्हाळवाडीचे माजी उपसरपंच पिराजी आव्हाळे अशी या व्यावसायिकांची नवे आहेत.

संतोष पायगुडे ( देशमुख ) -- काही महिन्यांपूर्वी माझ्यासाहित कुटुंबांला कोरोनाची बाधा झाली. आम्ही खूप सकारात्मक राहिलो. यामुळे यातून आम्ही बाहेर पडलो. सध्या यावर मात करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय आहे. सरकारने जरी लसीकरण मोफत केले असले तरी मी माझ्या कामगारासहित 50 जणांच्या लसीकरणाचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. माझा खाण व क्रशरचा व्यवसाय आहे. लॉकडॉन मुळे व्यवसाय सध्या खूप मंद आहे. हे दिवस ही जातील. आपलाही काही हातभार असावा यासाठी माझ्या 20 कामगारासह 50 जणांच्या लसीकरणाचा खर्च मी करणार असून ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे.

हेही वाचा: 'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

राहुल तांबे ( माजी सरपंच भावडी ) -- नोव्हेंबर 20 मध्ये मला ही कोरोनाची लागण झाली. मी घरीच विलगिकरणात राहिलो. खूप सकारात्मक राहिल्याने यातून बाहेर पडलो. माझा खाण व क्रशरचा व्यवसाय आहे. मी माझ्या कुटुंबीय सहित माझ्या 20 कांमगारांच्या लसीकर्णाचा खर्च करणार असून ती रक्कम मुख्यमंत्री सह्यात़ा निधीला देणार आहे. माझी ही रक्कम म्हणजे केवळ फुलांची पाकळी आहे. मात्र आपण काही तरी हातभार सरकारला लावत आहे. याचा आनंद आहे.

पिराजी आव्हाळे ( माजी उपसरपंच, आव्हाळवाडी ) -- कोरोनाने सर्व जग हलले. माझ्या कुटुंबियांनाही त्याने महिन्यांपूर्वी घेरले. मात्र त्यातून सकारात्मक विचाराने बाहेर पडलो. पैशापेक्षा दुसर्यांना मदतीचा हात देण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही. माझा काँक्रीट मिक्सर प्लांट चा व्यवसाय आहे. माझ्याकडे 20 कामगार काम करतात. सरकार जरी लसीकरण मोफत करणार असले तरी कामगार दिनाचे औचित्य साधून माझ्या कुटुंबीयासहित कामगारांचा व अन्य काही जणांच्या लसीकर्णाचा खर्च करणार असून ती रक्कम मुख्यमंत्री सह्याता निधीला देणार आहे.

आमची ही मदत फुल ना फुलांची पाकळी असून मदत करत असल्याचाच आनंद आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी अशा प्रकारे मदतीचा हात पुढे करावा. हे संकट जागांवरील संकट आहे. आपण ही त्याचाच एक भाग आहे. शेवटी कोरोनाला कायमच हरवणं हेच प्रत्येकाचे ध्येय असून त्यासाठी प्रत्येकाने हातभार लावावा. अशी अपेक्षा तिन्ही व्यावसायिकांनी व्यक्त केली.