Kaustubh Gawade
sakal
पुणे - 'शिक्षकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करणार आहे. टप्पा अनुदान, विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांचे प्रश्न आणि जुनी पेन्शन यांसारख्या विषयांवर शिक्षकांना पुन्हा आंदोलनाची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे,"अशी ग्वाही भाजपचे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी बुधवारी दिली. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी शिक्षकांचे आभार मानले. तसेच, आपल्या वयावरून झालेल्या टीकेला कामातून उत्तर देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.