पुणे : अग्निशमनदलातील पदं भरतीला वेग येणार का?; तीन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित

Rescue Van_fire brieged
Rescue Van_fire brieged

शहरात लागणाऱ्या आगीमुळे पुणेकरांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे, लाखो रुपयांचे नुकसान होऊन व्यावसायिक देशोधडीला लागत आहेत. आग विझविण्यासाठी यंत्रणा असली तरी अग्निशामक दलाकडील ५५ टक्के जागा रिक्त आहेत. शहरात वारंवार दुर्घटना घडत असताना पदभरतीच्या प्रक्रियेला तसेच कंत्राटी जवान नेमण्याच्या प्रक्रियेला आता तरी गती येणार का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पुणे : प्रमुख बाजारपेठांचे होणार फायर ऑडिट; महत्वाच्या बदलांची महापौरांची घोषणा

फॅशन स्ट्रीट येथील दुकानांची संख्या, ग्राहकांची होणारी गर्दी यामुळे येथे सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असल्याची वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित करून, शासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष याकडे वेधले होते. जर वेळेवर उपाय योजना केल्या असत्या तर ८०० दुकाने जळून खाक होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले नसते. पुणे शहराची हद्द, लोकसंख्या, इमारती, बाजारपेठ वाढत असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या उपाय योजना करणे गरजेचे आहे. आगीच्या घटना घडल्यानंतर अग्निशामक दलावरील जाण कमी व्हावा यासाठी पुरेसे व प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. पण पुणे महापालिकेकडील पदे रिक्त असल्याने सध्याच्या मनुष्यबळावर ताण येत आहे. अग्निशामक दलातील अधिकारी व कर्मचारी यांची भरतीसाठी ‘आदर्श सामाईक सेवा प्रवेश नियमावली’ अग्निशमन सेवा संचालनालयाने मार्च २०१८ मध्ये तयार केली. पण गेल्या तीन वर्षापासून नगरविकास खात्याने त्यास मान्यता दिली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलातील भरती रखडली आहे. सध्या अग्निशामक दलामध्ये विविध प्रकारची २८ पदे आहेत. त्यापैकी मुख्य अग्निशमन अधिकारी, कार्यदेशक (वाहन), सिनिअर रेडिओ टेक्निशियन, अधिक्षक, उपअधिक्षक आणि शिपाई ही सहा पदे पूर्ण क्षमतेने भरलेले असून तेथे केवळ सात जणच कार्यरत आहेत. उर्वरित २२ पदांसाठी ९०३ जागा उपलब्ध असल्या तरी तेथे सध्या ३९३ जण काम करत असून, ५१० जागा रिक्त आहेत, हे महापालिकडल आकडेवारीवरून समोर आले आहे.

पुणे महापालिका अग्निशमन दलात ५१० पदं रिक्त

‘‘पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलात ९१० पदांपैकी ५१० पदे रिक्त आहेत. राज्य शासनाकडून नियमावलीला मान्यता मिळत नसल्याने ही पदे भरता येत नाहीत. शहरात आगीच्या घटना वारंवार घडताना भरती प्रक्रियेला गती आली पाहिजे. नगरविकास विभाग त्यास दाद देत नसल्याने शहरातील आमदारांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे," असं सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितलं. 

भरती प्रक्रियेची मान्यता अंतिम टप्प्यात

‘‘नगरविकास विभागाकडून अग्निशामक दलाच्या भरतीसाठीच्या नियमावलीची मान्यता राज्य शासनाकडे अंतिम टप्प्यात आहे. ही मान्यता आल्यानंतर महापालिकेकडून आकृतिबंध तयार करून भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. तोपर्यंत शहराची वाढती गरज लक्षात घेता सुमारे सहा ठिकाणी नव्याने केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यासाठी चालक, तांडेल, यंत्रचालक यासह इतर पदावर सुमारे दीडशे कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहेत,’’ अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली. 
 
अग्निशमन दलातील रिक्त पदं

तांडेल - ४७
फायरमन - १९८
यंत्रचालक - १५२
रुग्णवाहिका चालक - ३७
उप अग्नीशमन अधिकारी - १७
सहाय्यक अग्निशमन अधिकारी - १८
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com