esakal | एका महिन्यात १०८ ऋग्णवाहिका देणार
sakal

बोलून बातमी शोधा

एका महिन्यात १०८ रुग्णवाहिका  देणार

एका महिन्यात १०८ रुग्णवाहिका देणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : अडिवरे व तिरपाड येथे १०८ रूग्णवाहिका एक महिन्यात दिल्या जाणार आहेत. तळेघर येथे कार्यरत असताना गरोदर माता मृत्यू प्रकरणी डॉ. जसेशकुमार बिरारी व इतरांची विभागीय समितीने चौकशी केलेला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील आरोग्य प्रश्न त्वरीत सुटावे यासाठी किसान सभेने आरोग्य उपसंचालक यांना निवेदन पाठविले होते. त्या अनुशंगाने किसान सभेच्या शिष्टमंडळा सोबत पुणे येथे बैठका घेण्यात आल्या, त्यावेळी डॉ. संजोग कदम यांनी ही माहिती दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा व्यवस्थापक डॉ. वेदव्यास मोरे, मुख्य प्रशासकीय अधिकारी मानसिंग सूर्यवंशी, आदि उपस्थित होते.

तळेघर ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम ५५ टक्के पूर्ण झाले आहे. ते काम पंधरा दिवसांत ७५ टक्के पुर्ण करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना देण्यात येणार आहे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पदमान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तिरपाड प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी सध्या इतर उपकेंद्रावरील कर्मचारी मदतीला घेऊन १५ दिवसांत आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

तसेच रूग्णांशी व्यवस्थित न वागणा-या कर्मचा-यांवर कारवाई केली जाईल .त्यांना योग्य त्या सूचना देण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष अॅड. नाथा शिंगाडे, जिल्हा सचिव डॉ. अमोल वाघमारे, डॉ. किशोर खिल्लारे, डॉ. ज्ञानेश्वर मोटे, राजू घोडे, अशोक पेकारी, दत्ता गिरंगे, पुंडलीक असवले उपस्थित होते.

loading image
go to top