ढेबेवाडी पवनचक्की कंपन्यांसह लगतच्या शेतकऱ्यांनाही नोटीसा

ढेबेवाडी पवनचक्की कंपन्यांसह लगतच्या शेतकऱ्यांनाही नोटीसा

Published on

पवनचक्की कंपन्या, शेतकऱ्यांना नोटीस

वणव्याच्या पार्श्वभूमीवर ढेबेवाडीत वन विभाग अलर्ट; डोंगररांगा काळवंडल्या

ढेबेवाडी, ता. १ : गेल्यावर्षी झालेल्या अतिपावसामुळे डोंगर परिसरात वाढलेले उंच गवत सध्या पूर्ण वाळले आहे. वणवा भडकण्याचे आणि फैलावण्याचे ते प्रमुख कारण बनले आहे. दररोज कुठे ना कुठे डोंगरात आगीचे लोळ उसळत असल्याने त्यावर नियंत्रण आणताना वनकर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक सुरू आहे. वणव्यास जबाबदार अनेक कारणांमध्ये वनहद्दीला लागूनच असलेल्या खासगी जमीन क्षेत्राच्या मालकांबरोबरच पवनचक्क्या उभ्या केलेल्या कंपन्यांचा बेजबाबदारपणा हेही एक कारण असल्याने वन विभागाने संबंधित कंपन्यांसह खासगी मालकांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

परिसराला समृद्ध वनसंपदा लाभली असून, प्रादेशिक व वन्यजीव अशी त्याची विभागणी झाली आहे. वनहद्दीला लागूनच असलेला मालकीचा शेजार आणि गेल्या अनेक वर्षांपासून जंगलात भिरभिरणाऱ्या पवनचक्क्या वन विभागासाठी डोकेदुखी ठरल्या आहेत. दरवर्षी त्या परिसरात फैलावणारे वणवे आणि त्यात होणारी वनसंपदेची हानी यामागचेही तेही एक कारण असल्याचे समोर आले आहे. अनेक वर्षांपासून विविध कंपन्यांनी पवनचक्क्या उभारून त्यातून कमाई सुरू केली आहे. ज्या निकष, अटींवर त्यांना पवनऊर्जा प्रकल्प उभारणीस परवानगी दिली, त्याचे पालन होते का? हा संशोधनाचा विषय आहे. वणवे भडकू नये, यासाठी पवनचक्की परिसरात जाळपट्टे कढण्याकडे अनेक कंपन्या दुर्लक्ष करत असल्याने शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणांनी ठिणग्या पडून वणवे लागतात. या पार्श्वभूमीवर वन विभागातर्फे प्रतिवर्षी कंपन्यांना नोटिसीही दिल्या जातात. मात्र, त्यातील किती कंपन्या ही नोटीस गांभीर्याने घेतात? हा प्रश्नच आहे. यंदाही संबंधितासह जंगलालगतच्या जमीन मालकांना नोटिसा पाठविल्या आहेत.
--------
(चौकट)
--------

...तर नुकसानीस स्वतः जबाबदार


पवनचक्की उभारलेले क्षेत्र हे वनक्षेत्र व लगत आहे. त्यामुळे या क्षेत्रात वणवा लागण्याचा संभव जास्त आहे. त्यामुळे पवनचक्कीच्या सभोवती जाळरेषा काढाव्यात, भविष्यात अधिनस्त क्षेत्रातून वणवा लगतच्या रोपवन किंवा वनक्षेत्रात आल्यास होणाऱ्या नुकसानीस आपणास जबाबदार धरण्यात येईल, त्या अनुषंगाने उद्‌भवणाऱ्या पेचप्रसंगास आपण स्वतः जबाबदार राहाल, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. लगतच्या मालकी क्षेत्रातील शेतकऱ्यांनाही अशाच प्रकारची समज दिल्याचे सांगण्यात आले.


B08164
जौंजाळवाडी ः विभागातील डोंगरपट्ट्यातील पवनचक्क्या असलेला परिसरही वणव्यात होरपळत आहे.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com