विंग हलक्याशा पावसाने नुकसान

विंग हलक्याशा पावसाने नुकसान
Published on

कडबा भिजला; गहू, ज्वारी भुईसपाट

विंग परिसरात पावसाचा शिडकावा; बदलत्या वातावरणाने पीक नुकसानीची भीती

विंग/काेळे, ता. २२ ः मध्यरात्रीनंतर परिसरात पावसाने हलका शिडकावा केला. या पावसाने रब्बीतील पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणी केलेला कडबा भिजला असून, काही ठिकाणी गहू कोलमडला आहे. बदलत्या वातावरणाने उत्पादकांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातून हंगाम हाती कसा लागतो, याकडे उत्पादकाचे लक्ष लागून आहे.

जून- जुलैदरम्यान पेरणी केलेली विंगसह विभागात संकरित ज्वारी व गहू आता समाधानकारक स्थितीत आहे. काढणीच्या ऐन मोक्यात ही पिके आहेत. गहू तसेच ज्वारीही भरली आहेत. शिवारात बघताक्षणी लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची आशा पल्लवीत झाल्या असताना गेल्या दोन दिवसांपासून बदलत्या वातावरणाने उत्पादक हवालदिल झाला आहेत. ढगाळ वातावरण, पावसाचे सावट निर्माण झाले आहे. उकाडाही कमालीचा वाढला आहे. अचानक निर्माण झालेल्या वातावरणाची चिंता उत्पादकांत वाढली आहे. हंगाम हाती कसा लागतो? याकडे लक्ष लागून राहिले आहे. काही ठिकाणी आगाप पेरणी केलेल्या पिकांची काढणीही उत्पादकांनी हाती घेतली आहे. खास करून संकरित ज्वारीची काढणी सुरू आहे. काढणीच्या तोंडावरच विंगसह परिसरात काल मध्यरात्री पावसाने हलकासा शिडकावा केला. तुरळक पावसाने परिसरात कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यात काढणी केलेला कडबा भिजला. काही ठिकाणी गहू भुईसपाट झाला आहे, तसेच ज्वारीही कोलमडली. कमी अधिक प्रमाणात पावसाने पिकांचे नुकसान केले. पावसाने उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.
............

हंगाम वाचविण्याची चिंता

अद्याप वातावरणात कमालीची गरमी असून, ढगाळ वातावरणही कायम आहे. पाऊस कधी येईल, हे सांगता येणे मुश्कील आहे. पीक काढणीत व्यत्यय यासह पीक नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. हंगाम कसा वाचवायचा, या विवेचनात शेतकरी आहेत. वातावरणाचा अंदाज घेऊन ज्वारी गहू काढणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
....................................

B02203,
विंग ः वादळी वाऱ्यासह शनिवारी रात्री झालेल्या पावसाने ठिकठिकाणी गहू भुईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. (विलास खबाले ः सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com