विंग तारांगण विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

विंग तारांगण विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

Published on

विंगमध्ये भरला बालवैज्ञानिकांचा मेळा

विंग, ता. ५ ः राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त येथील तारांगण इंग्लिश विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानिमित्ताने विविध उपकरणांसह बालवैज्ञानिक अवतरले.

विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, या हेतूने विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांसह पालक, ग्रामस्थांतून त्यास प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर उपयुक्त प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. नवोपक्रमाचा चमत्कार घडवला. प्रदर्शन पाहून सर्वजण भारावून गेले. केजी गट, प्राथमिक गट, माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला. हेल्दी-अनहेल्दी फूड्स‌, वॉटर सायकल, रोड मॅाडेल, हाऊ आय लर्न इंग्लिश इन क्लासरूम, रेन हार्वेस्टिंग, बायोगॅस प्लांट, ग्रास कटिंग मशिन, सोशल मीडिया डिव्हाइस, अर्थक्वेक अलार्म मॅाडेल यासह सौरऊर्जा प्रकल्प, पूरसूचक यंत्र टाकाऊपासून टिकाऊ वस्तूची निर्मिती करणारे विविध उपकरणे विद्यार्थ्यांनी साकारली.
दै. ‘सकाळ’चे विंग बातमीदार विलास खबाले यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. प्रा. अर्चना माने, प्रा. माया मदने, प्रा. जी. एस. पवार, आनंदराव शिंदे, निलांबरी शिंदे, मुख्याध्यापिका वर्षा साळुंखे, आर. एस. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. मनीषा भिंगारदेवे यांनी आभार मानले.


B02221
विंग ः विज्ञान प्रदर्शनात पाहणी करताना पालक, मान्यवर. (विलास खबाले ः सकाळ छायाचित्रसेवा)
........................................

Marathi News Esakal
www.esakal.com