पुणे - शहरातील किमान तापमानामध्ये मोठी घट झाली होती. त्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे. परिणामी शहरातील थंडी ओसरली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.