Winter Season : थंडीत रहा ऊर्जावान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Season

Winter Season : थंडीत रहा ऊर्जावान!

पुणे : हिवाळा हा आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर मानला जातो. या काळात शरीराला ऊर्जा देण्याचे काम हे सुकामेवा करते. सुकामेव्यामध्ये ऑईल्स असतात, ते खाल्ल्याने सतत भूक लागत नाही. हिवाळ्यात दिवसभरात मूठभर सुकामेवा खाल्लेला चालतो. त्यातून ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळाल्याने शरीराची वाढ चांगली होते. सुकामेव्यामध्ये बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू खाताना गूळ किंवा तिळाबरोबर घेतल्यास अजून फायदेशीर ठरते, असे आहारतज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक यांनी सांगितले. सध्या सुकामेव्याची मागणी वाढली असून, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्वस्त झाला आहे.

मागणी कशाला?

बदाम, खोबरे, जर्दाळू, अक्रोड, मनुका, पिस्ता

...हे व्हिटॅमिन्स मिळतात

ए, सी, कॅल्शिअम, आयर्न, पोटॅशिअम

मागणी का?

थंडीत खोबरे, डिंक, मेथी आदींपासून तयार केलेल्या लाडूंना जास्त मागणी असते. हे पदार्थ बनविण्यास ड्रायफ्रूट वापरले जात असल्याने काजू, बदाम, पिस्ते, खारीक, खोबरे आदींना मागणी आहे.

सद्यःस्थिती काय?

 • थंडीमुळे मागणीत वाढ

 • सुकामेव्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात

 • बाजारात आवक जास्त

 • मालवाहू कंटेनर सहज उपलब्ध

 • कोरोनाचे सावट नसल्याने आयात वाढली

येथून होते आयात

 • बदाम : कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान

 • मॉमेरोन बदाम : इराण

 • पिस्ता : इराण, इराक, टर्की, अमेरिका

 • खारा पिस्ता : इराण, अमेरिका

 • अक्रोड : अमेरिका, चिली, भारताच्या काही भागातून

 • अंजीर : इराण, अफगाणिस्तान

 • बेदाणा : अफगाणिस्तान, भारत

 • खारीक : पाकिस्तान, सोरी खारीक : ओमान

देशांतर्गत आवक

 • खोबरे : तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक

 • काजू : गोवा, कर्नाटक, कोकण, केरळ

 • मनुके : सांगली, विजापूर, नाशिक, पंढरपूर

यांचे दर घटले

घाऊक बाजारातील सुकामेव्याचे एक किलोचे दर (रु.)

 • प्रकार नोव्हेंबर २१ नोव्हेंबर २२

 • बदाम ७०० ते ८५० ५५० ते ६५०

 • अख्खा अक्रोड ५०० ते ७०० ४५० ते ६००

 • अक्रोड ९०० ते १२०० ७०० ते १०००

 • जर्दाळू ५०० ते ८०० ३०० ते ५००

 • खोबरे १८० ते २१० १४० ते १६०

 • पूर्ण पिस्ता १००० ते १३०० ८०० ते १०००

 • काजू ७०० ते ९०० ६०० ते ८००

यांचे दर वाढले

 • प्रकार नोव्हेंबर २१ नोव्हेंबर २२

 • अंजीर ५०० ते ८०० ९०० ते १५००

 • खजूर ६० ते २०० १०० ते ४००

 • खारीक ७० ते १२० १५० ते ३५०

हिवाळ्यात आरोग्यासाठी विविध पौष्टिक पदार्थ तयार करण्याकडे नागरिकांचा कल असतो. ते पदार्थ बनविण्यासाठी सुकामेव्याचा वापर वाढतो. म्हणून थंडीच्या मोसमात दरवर्षी सुकामेव्याला मागणी वाढते. यंदाही घरगुती डिंकाचे लाडू करणाऱ्यासाठी खोबरे, खारीक, डिंक यांची मागणी वाढली आहे.

- आयुष गोयल,सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड

पाकिस्तानात पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने खरिकचे दर वाढलेले आहेत. तसेच भारतातील पीक चांगले असल्याने काही वस्तू स्वस्त आहेत, तर डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे आयात होणाऱ्या काही वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील विविध घडामोडींमुळे अंजीर, खजुराच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

- शुभम गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड

टॅग्स :WinterDry fruitshealth