

Winter Health
sakal
पुणे : हिवाळ्यात मेंदू पक्षाघाताच्या रुग्ण (पॅरालिसिस) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मेंदू शल्यचिकित्सकांच्या निरीक्षणानुसार यात सुमारे २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे. यामागे पर्यावरणीय घटक, शारीरिक हालचालींमध्ये झालेली घट, शरीरातील पाण्याची कमतरता व त्याने रक्तातील वाढणारा घट्टपणा, हंगामी होणारा संसर्ग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या दीर्घकालीन आजारांचे नियंत्रण बिघडणे ही यामागील कारणे सांगितली जात आहेत.